खिर्डी खु.ग्रामपंचायतचा मनमानी कारभार,पाइप लाईन लिकेज जोडण्यास टाळाटाळ?
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। बलवाडी रस्त्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ नवीन पाइप लाईन टाकताना जुनी पाइप लाईन फुटली असता नट बोल्ट प्लेट च्या साह्याने सदरील लीकेज व्यवस्थित न जोडल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.तसेच या भागातील रहिवाश्यांनी लिकेज बंद करण्याकरिता अनेक वेळा सरपंच व वार्ड प्रतिनिधी यांना फोन वरून माहिती देवून हि जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे.
सांडपाण्याच्या गटारी जवळच पाइप लाइन लीक झाली असून दुर्गंधी युक्त सांडपाणी मिक्स होवून दूषित पाणी पिण्याने नागरिकांना अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागेल.तसेच लोकांचे आरोग्य बाधित झाल्यास सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासनास जबाबदार धरण्यात यावे अशा बेजबाबदार पणे वागणाऱ्या व मनमानी करणाऱ्या वार्ड प्रतिनिधी वर योग्य ती कारवाई करण्यात यावी सध्या कोरोना काळात नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.पाइप लाइन चे लिकेज लवकरात लवकर बंद करण्यात यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. तसेच लिकेज बंद न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.