भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

तीन वर्षांपासून रखडलेल्या शौचालय प्रोत्साहनपर अनुदानाचे लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत, काही गौड बंगाल तर नाही ना?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर, प्रतिनिधी। बरावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथे 2018 ते 2019 या कालावधीत अनेक लाभार्थ्यांनी शासनाच्या स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम केले आहे. परंतु त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. अनेक लाभार्थी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.लाभार्थ्यांनी त्यांच्या नातेवाईक तसेच शेजारी पाजारी लोकांकडून उसनवार पैसे घेऊन शौचालयाचे बांधकाम केले आहे परंतु वेळेवर अनुदान न मिळाल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शौचालय मंजूर होताच अनेकांनी स्वत:कडील व ज्यांच्याकडे पैसे नव्हते, अशा लाभार्थ्यांनी उसनवार पैसे घेऊन शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. एक दोन महिन्यात अनुदानाची रक्कम मिळेल, अशी लाभार्थ्यांना अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.

मागील तीन वर्षापासून वैयक्तिक शौचालयाचे अनुदान रखडले आहे. वैयक्तिक शौचालयांचा लाभ घेणारे लाभार्थी हे बहुतांश गोरगरीब शेतमजूर, आहेत.त्यांनी शौचालय बांधकामासाठी लागणारे साहित्याची उधारी खरेदी केली असून दुकानदारांची बिले अद्यापही द्यायची बाकी असून अनुदान मिळत नसल्याने या बाबत विचारणा करण्यासाठी रावेर पंचायत समिती कार्यालयात लाभार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहे.तसेच येत्या आठ ते दहा दिवसात तुमच्या खात्यावर रक्कम टाकण्यात येईल असे सांगितले जात असून यात काही गौड बंगाल तर नाही ना?असा प्रश्न नेहमी लाभधारकांना पडत आहे.तसेच या कडे गटविकास अधिकारी यांनी त्वरित लक्ष देवून लवकरात लवकर रखडलेले अनुदान वितरीत करावे अशी मागणी लाभधारकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!