खिर्डी बु! येथे किलबिल व पालक मेळावा उत्साहात साजरा
खिर्डी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत खिर्डी बुद्रुक ता.रावेर येथे किलबिल व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात अंगणवाडी सेविकांना कर्मचारी यांनी विविध प्रकारचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले होते.
प्रकल्प पर्यवेक्षिका ज्योती तापरे यांनी मार्गदर्शन केलं .पालकांनी आपल्या बालकांसाठी वेळ दिला पाहिजे तसेच आपल्या मुलांवर चांगले संस्कार,व संधी उपलब्ध करून देणे जेणेकरून मुलांचा मेंदूचा विकास जो आपण 3 वर्षाचा आत 75%. होणे अपेक्षित आहे तो योग्य रितीने झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.अंगणवाडी तर्फे वेगवेगळे उपक्रम तयार करून पालकांनी व मुलांनी याचा लाभ घ्यावा म्हणून किलबिल व पालक मेळावा आयोजित करण्यात आला या मेळाव्यात बरेच पालक व बालक सहभागी झाले होते.
कार्यक्रम चे अध्यक्ष खिर्डी बु लोकनियुक्त सरपंच सौ.संगीता पाटील, ग्रा.पं.सदस्य देवकाबाई महाजन जि.प. मराठी शाळा मुख्याध्यापक वारके, शिक्षक तडवी , एकात्मिक बा.वि.प्रकल्प पर्यवेक्षिका ज्योती तापरे ,हफिजा तडवी,रोजगार सेवक उमेश तायडे, पत्रकार विनायक जहुरे, व्यवस्थापन समिती सदस्य संकेत पाटील, अंगणवाडी सेविका,मदतनीस , आशा वर्कर व माता पालक, बालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.