तांदलवाडी परिसरात केबल चोऱ्या सुरूच, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। येथून जवळच असलेल्या तांदलवाडी परिसरात विद्युत पंपाच्या केबल चोऱ्या सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत मार्च महिन्यात जगदीश नमायते या शेतकऱ्याची ३०० फूट केबल वायर व गोपाळ महाजन यांची २०० फूट केबल वायर चोरीला गेली होती, मागील महिन्यात दि.२७ मे ला भूषण चौधरी व शांताराम चौधरी या २ शेतकऱ्यांच्या १२०० फूट केबल वायर चोरीस गेल्या होत्या त्यानंतर लगेच ३ दिवसात पुन्हा नव्याने टाकलेल्या ६००फूट वायर दि.३०मे रोजी रात्रीच्या वेळी चोरून नेली घटनेला महिना होत नाही तोच शांताराम चौधरी,के.टी. पाटील,दीपक चौधरी, जगदीश नमायते,गोपाळ महाजन सर्व रा.तांदलवाडी या शेतकऱ्यांच्या केबल वायर दि.२४ जूनच्या मध्यरात्री चोरीला गेल्या असून फार मोठा आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रास होत आहे.
पो.स्टे. ला खबर मिळताच निंभोरा पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी नदीपात्रात पायी चालत घटनास्थळी भेट दिली व पंचनामे करून चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा. पो.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ईश्वर चव्हाण तपास करीत आहे.तसेच रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून वाहनांची सुध्दा कसून तपासणी करण्यात येत आहे,त्यांच्या सोबत निवृत्त पो.पा. सुधाकर चौधरी,शशांक पाटील,भूषण चौधरी,चंद्रकांत पाटील,अभिजित तायडे,प्रतीक महाजन,गौरव महाजन,अक्षय चौधरी तसेच शेतकरी बांधव,पोलीस कर्मचारी उपस्थित होते