इस्टीमेट अभावी रस्त्याचे काँक्रीटीकरण रखडले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। खिर्डी खु येथील बाजारपेठ परिसरातून जाणारा बलवाडी रस्ता पूर्णतः खोलगट भागात असून ऐन पावसाळ्यात या ठिकाणी आजूबाजूच्या शेत शिवारातील तसेच गावातील सांडपाणी जमा होवून तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण होत असते.या रस्त्याने पावसाळ्यात वाहन धारकांना आपला जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो.सदरील रस्ता व गटारे यांची लेव्हल समांतर झाल्याने गटार ओव्हरफ्लो झाल्यास पाणी रस्त्यावरून वाहत असते.
रस्त्याचे काम मंजूर झाले असून संबंधित ठेकेदाराने २ फेब्रुवारी रोजी काम सुरू केले परंतु हा मुख्य रस्ता असल्याने फक्त ७ मीटर लांबीचा रस्ता काँक्रीटीकरण करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याना सांगितले की रस्त्याचे काम एकवेळेस होईल म्हणून आपण रस्त्याचे काँक्रीटीकरण रस्त्याच्या दोन्ही बाजू पर्यंत करण्यात यावे तसेच इस्टीमेट अभावी काम करू देणार नाही,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे परंतु ठेकेदाराने इस्टीमेट जागेवर उपलब्ध न केल्याने ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असता काम अद्यापही रखडलेले आहे.