देशी दारू दुकानासाठी केलेला बोगस एनओसी चा वादग्रस्त ठराव रद्द करण्याचे आदेश,खिर्डी बु.येथील वादग्रस्त ग्रामसेवक नॉटरिचेबल..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। खिर्डी बु येथील ग्रामसेवक विजयकुमार महाजन यांनी २७-८-२०२१रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती सदरील ग्राम सभेचा अजेंडा प्रसिध्द करण्यात आला होता परंतु कोरम अभावी तहकूब झालेली ग्राम सभा हि दि.३०-८-२०२१रोजी घेण्यात आली होती.
त्या सभेमध्ये कोणत्याही प्रकारचे विषयावर चर्चा न करता तांदलवाडी या गावी जनाबाई काशिनाथ तायडे यांच्या नावे सुरू असलेले सरकारमान्य परवाना धारक देशी दारूचे दुकान खिर्डी बु येथील ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसलेल्या गट नं३८३ या भर वस्तीत सदरील देशी दारूचे स्थलांतरित झालेले दुकान या जागेवर सुरू करण्यासाठी नाहरकत परवानगी देण्यासाठी ग्रामसेवक व काही ग्राम पंचायत सदस्य यांनी ग्रामस्थांची दिशाभूल करून बोगस व खोटा ठराव तयार करून जिल्हाधिकारी जळगाव व राज्य उत्पादन शुल्क विभागीय कार्यालय भुसावळ यांना पुढील कारवाई साठी पाठविण्यात आला होता.या गैरप्रकाराची कुणकुण ग्रामस्थांना लागताच त्यांनी सर्व डाव उधळून लावून या संदर्भात ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांचे कडे १८-१-२०२२रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रार अर्जाची दखल घेत ग्राम विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे यांना बोगस ठराव रद्द कण्यात यावा असे आदेश गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल मॅडम यांनी दिले आहे.तसेच चौकशी अंती काय कारवाई होईल या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
बोगस ठराव
खिर्डी बु येथील वादग्रस्त ग्रामसेवक प्रकरणी गट विकास अधिकारी यांना भ्रमण ध्वनी द्वारे संपर्क केला असता ग्राम विस्तार अधिकार्याला ठराव रद्द करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत असे बोलताना सांगितले. दिपाली कोतवाल
गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर