खिर्डी-ऐनपुर परिसरात कपाशी, केळी लागवडीस प्रारंभ,मात्र वीजे अभावी पिकांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त.
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। ऐनपुर खिर्डी
परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून दररोज तुरळक पाऊस पडत आहे परंतु सदरचा पाऊस हा बेमोसमी असून पेरणीस योग्य नाही असे असताना सुद्धा काही शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी केळीच्या बागांची लागवडीला प्रारंभ केलेला दिसत आहे.परंतु खिर्डी ऐनपूर परिसरात 27 मे रोजी चक्रीवादळाने थैमान घातले होते त्यावेळेस निंभोरा येथील 25 KV चे ट्रांसफार्मर जळाले होते नवीन ट्रांसफार्मर चे काम अद्याप सुरू असल्यामुळे शेतीला मिळणारी वीज अतिशय कमी प्रमाणात मिळत आहे फक्त सहा तास वीज शेतीला मिळत आहे पूर्वी रात्री दहा तास वीज शेतीला मिळत होती परंतु आता सहा तास अशीच वीज शेतकऱ्यांना मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेले केळी व कपाशीचे रोपे वाळत आहेत त्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ न शकल्यामुळे पिके कोमेजलेली दिसत आहेत त्यामुळे लवकरात लवकर नवीन ट्रांसफार्मर बसवून शेतकऱ्यांना वीज पुरवठा पूर्वीप्रमाणेच मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागेल,
आज ऐनपूर निंबोल, विवरे येथील वीज उपकेंद्रावर फक्त 5 KV चे ट्रांसफार्मर असल्यामुळे अतिशय कमी प्रमाणात वीज शेतकऱ्यांना मिळत आहे शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अतिशय अल्प वेळ होत असल्यामुळे पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळण्यास अडचण येत आहेत. पाणी आहे पण वीज नाही त्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही . विजेच्या अभावी कपाशी, केळी या पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही आहे त्यात मान्सूनच्या पावसाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.
तसेच 27 मे या दिवशी ऐनपूर खिर्डी, निंबोल, कांडवेल, सुलवाडी, धामोडी, कोळदा, निंभोरासिम ,या ठिकाणी चक्रीवादळाचा खूप मोठा फटका बसला असून त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या केळी बागांचे नुकसान झाले होते तर काही लोकांच्या घरावरील छप्पर देखील उडाले होते विजेचे अनेक खांब कोसळले होते अनेक रोहित्र जळालेल्या होत्या त्याच बरोबर निंभोरा येथील एक ट्रांसफार्मर सुद्धा जळालेले होते 25 के व्ही क्षमतेचे हे ट्रांसफार्मर जळाल्यामुळे ऐनपूर ,निंबोल, खिर्डी, विवरा या भागातील शेतकऱ्यांना दिवसातून फक्त सहा तास वीज पुरवठा देण्यात येत होता परंतु आता मात्र उद्यापासून पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना वीज पुरवठा केला जाईल असे रावेर येथील उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांनी सांगितले या चक्रीवादळामुळे जवळपास 150 पोल या परिसरातील पडलेले होते उच्च दाब वाहिन्या तुटलेल्या होत्या सात वीज रोहित्र जळालेले होते त्यात शेती साठी असणारे लघुदाब रोहित्र सुद्धा मोठ्या प्रमाणात होते या सर्व कामांसाठी दुरुस्तीसाठी दहा ते बारा दिवस त्या ठिकाणी लागले आज 95 टक्के काम विजेचे झालेले आहे यासाठी मुख्य कार्यकारी अभियंता सपकाळे सावदा व उपमुख्य कार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा ते बारा दिवसांपासुन काम सुरू होते यात 40 वायरमन 40 ठेकेदारांची माणसे ही मेहनत घेत होते, त्याच्यासोबत सहाय्यक अभियंता ऐनपूर देवेंद्र महाजन, सहाय्यक अभियंता खिर्डी योगेश पाटील ,सहाय्यक अभियंता तुषार गाजरे विवरा, सहाय्यक अभियंता प्रयास मांडवे निंबोल. यांच्यासह जवळपास शंभर लोकांची टीम या ठिकाणी या सर्व कामासाठी कार्यरत होती 95 टक्के काम हे पूर्ण झालेले असून ऐनपूर परिसरातील आठ ते दहा पोलचे काम बाकी आहे उद्यापर्यंत तेही पूर्ण होईल व पूर्वीसारखा नियमित प्रमाणे घरगुती शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू केला जाईल असे उपकार्यकारी अभियंता प्रभूचरण चौधरी रावेर यांनी मंडे टू मंडे शी बोलतांना माहिती देण्यात आली.