खिर्डी खु.येथील शौचालय परिसरात घाणीचे साम्राज्य,नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथील गट नं.३बाजार पेठ परिसरात १०ते१५ वर्षापासून दलीत वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहेत.परंतु वॉर्ड नंबर एक चे प्रतिनिधी जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून आज पर्यंत सदर ठिकाणी दिवा बत्तीची,पाण्याची, व पोहोच रस्त्याची सोय करण्यात आलेली नसून रात्री बेरात्री नैसर्गिक विधी साठी अंधारातून पायवाट काढत रस्ता पार करावा लागतो.
तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून जवळच गावातील सांडपाणी वाहून नेणारी गटार असल्याने त्या ठिकाणाहून भले मोठे साप या ठिकाणी अन्नाच्या शोधार्थ फिरताना दिसतात त्या मुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर ठिकाणी असलेले उकिरडे यांची योग्य ती विल्हेवाट लावण्यात यावी तसेच या ठिकाणी पाणी, वीज, रस्ता,या सोयी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे तसेच शौचालयाची साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.