भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

मुख्यालयी राहात नसलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। सर्व शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांचे अपडाऊन हा जनतेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. परिणामी समस्या कमी न होता वाढत चालल्या आहेत.तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांसाठी निवास स्थान असतांनाही त्याचा वापर शून्य असल्याने करोडो रुपयांच्या या इमारतींना वापराअभावी दयनीय झाली आहे.विशेष म्हणजे वरीष्ठ अधिकारी नियम पाळत नसल्याने कनिष्ठावर कारवाई होणार कशी ? हा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

सद्यस्थितीत सर्व शासकीय विभागाचे जवळपास वरिष्ठांपासून तर कनिष्ठापर्यंतचे सर्व अधिकारी कर्मचारी हे शहरी भागातून येऊन त्या त्या विभागाचा कारभार बघत आहेत. अनेक विभागांना कर्मचारी निवासस्थाने नसतीलही परंतु ज्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध केलेली आहेत, त्याचा खरोखर वापर होत आहे का? हा महत्वाचा विषय असून बोटावर मोजण्याइतपत कर्मचारी सोडले तर इतर कर्मचारी हे शहरी भागातून ये-जा करीत आहेत. काही महत्वपूर्ण विभागाचे कर्मचारी हे मुख्यालयी राहणे गरजेचे असताना अधून मधून दांड्या मारत असतात तसेच वरिष्ठांच्या वरदहस्तामुळे या कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत असून, त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. आज रोजी आरोग्यसेवक,पशू वैद्यकीय अधिकारी, शिक्षण व स्थानिक प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे ही काळाची गरज असतांनाही या महत्वपूर्ण विषयाकडे जिल्हा प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले आहे. अगोदरच अनेक विभागात रिक्त पदे असून कर्मचाऱ्यांनी कमतरता जाणवत असल्याने जनतेची वेळेवर कामे होत नाही. त्यातच वेळ प्रसंगी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत.आज घडीला ग्रामीण भागात कोणीच राहायला तयार नसल्याने शासकीय सोयीसुविधांचा बट्टयाबोळ झाल्याचे चित्र दिसत आहे. वरीष्ठच मुख्यालयी राहत नसल्याने बाकीच्या कर्मचाऱ्यांनाही फावले असून जवळपास कर्मचारी वेळ मिळेल तेंव्हा आपल्या कार्यालयात दाखल होतअसल्याने जनतेची कामे दिवसेंदिवस रेंगाळत आहेत जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!