२५ वर्षीय विवाहित तरुणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी. ता. रावेर (प्रतिनिधी)। येथून जवळच असलेल्या दसनुर ता.रावेर येथे घराच्या बांधकामावर पाणी टाकत असतांना विजेचा धक्का लागल्याचे २५ वर्षीय विवाहित तरूणाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली .
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दसनूर येथील अविनाश बाजीराव पाटील यांचा मुलगा अमित उर्फ ओम ,वय २५ हा काल सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घराच्या बांधकामावर पाणी टाकत असतांना अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या बाबत चौकशी केली असता वर्षभरापूर्वीच अमितचा विवाह झाला असून अमित हा एकुलता एक मुलगा असल्याचे सांगितले गेले तसेच कालच त्याचा वाढदिवसही होता.एकुलता एक विवाहित मुलाच्या मृत्यूने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.