रावेर

रस्त्यावर पसरले गाळयुक्त चिखलाचे साम्राज्य

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। खिर्डी बु येथील ग्रा.पंचायत हद्दीतून खिर्डी ते भामलवाडी या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला असलेली मुख्य गटार जेसीबी द्वारे साफ सफाई करण्यात आली. परंतु सदरील गाळाची वाहतूक ट्रॅक्टर द्वारे करण्यात आली असता ट्रॉली ओव्हर फ्लो झाल्याने संपूर्ण रस्ता गाळ युक्त चिखलाचे माखला असून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वार व शाळकरी मुले घसरून पडत आहे.कोणाला काही दुखापत झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे.

विशेषतः आज गावचा आठवड्याचा बाजार असल्याने गावातील मुख्य रस्त्यावर गाळ युक्त चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.त्यामुळे व्यापारी आपली दुकाने थाटनार कसे असा पेच पडत आहे.तरी सदरहू रस्त्यावर पडलेला गाळ युक्त चिखल ग्राम पंचायत प्रशासनाने योग्य ते नियोजन करून त्वरित रस्त्याची साफ करण्यात यावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!