भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी ते ऐंनपुर रस्त्यावर खडड्यांचे साम्राज्य बांधकाम विभागाचे दुर्लक्ष..

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा।। खिर्डी ते ऐनपूर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून या भागातील गावांना व राज्य मार्गाला जोडणारा एकमेव रस्ता असून या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर सोसायट्या, शाळा, महाविद्यालये असून या रस्त्याने शालेय विद्यार्थी,शेतकरी,इतर वाहन धारक नेहमी येजा करत असतात तसेच ठिकठिकाणी असलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.

ऐन पावसाळ्यात रस्त्याला पुराचे स्वरूप आल्यामुळे विशेषतः दुचाकी धारकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागली. पाण्यामधून वाट काढताना अनेकवेळा अंदाज न आल्यामुळे छोटेमोठे अपघाताला सामोरे जावे लागले या रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यामुळे पावसाचे पूर्ण पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्त्याला पुराचे स्वरूप येत असते. खरे तर मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती उद्भवलेली असताना देखील संबधित विभागाला अद्यापही जागा झालेला दिसून येत नाही. रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे काम करणे गरजेचे आहे. संबधित अधिकारी एखादी दुर्घटना होण्याची वाट बघत आहेत का? असा प्रश्न वाहनधारकांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!