वादळी पावसामुळे घरांचे व शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर.मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यामध्ये 27 मे 2021 रोजी झालेल्या वादळ पाऊस झाल्याने शेतीसह घरांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून तालुक्यातील 19 गावांमध्ये 873 घरांचे झाले असून पंचनामे सुध्दा झाले.परंतु आजपावेतो त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही.फक्त आश्वासन देवून राज्य सरकार गरीब लोकांची दिशाभूल करीत आहे.
यातच कोरोना काळामध्ये ग्रामीण भागातील लोकांना काम धंदे नसल्यामुळे त्यांना आर्थिक स्थितीला सामोरे जावे लागते.तसेच या सरकारला जनतेची जाणीव नाही.ज्या शेतकऱ्यांचे केळी बागाचे नुकसान झाले आहे. व ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला नाही.त्यांना सुध्दा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.येत्या 15 दिवसात काही नुकसान भरपाई न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून 1 दिवसीय उपोषण करण्यात येईल असा इशारा पं.स.सभापती सौ.कविताताई कोळी,ताईबाई कोळी, कल्पना पाटील, स्विटी पाटील, आशा बाई पाटील,मनीषा पाटील, यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.