भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

अखेर खिर्डी खु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आवारात साफ सफाई करण्यास सुरुवात

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर, मंडे टू मंडे,प्रतिनिधी। निंभोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या खिर्डी खु येथील आरोग्य उपकेंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा,वाढलेले गवत यामुळे अस्वच्छता पसरली होती.तसेच डासांचे प्रमाणात ही वाढ झाली होती या बद्दल अनेक ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला होता.

या बाबतची सविस्तर माहिती मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी यांना मिळाल्यावर प्रत्यक्ष पाहणी करून दि २२-२-२२ रोजी खिर्डी खु येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र घाणीच्या साम्राज्यामुळे झाले डासांच्या उत्पत्तीचे पैदास केंद्र या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.वृत्त प्रकाशित होताच काही तासाच्या आत समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र खिर्डी खु यांनी त्वरित दखल घेत ग्राम पंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार करून आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात असलेल्या घाणीची विल्हेवाट लावण्यात यावी.या पत्रास ग्राम पंचायत प्रशासनाने प्रतिसाद देत लागलीच परिसराची साफसफाई करण्यास सुरुवात करण्यात आली.तसेच आरोग्य उपकेंद्राच्या आजु बाजूने कुंपण घालून मुख्य रस्त्याच्या ठिकाणी लवकरच गेट बसविण्यात येईल अशी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रतीक पाटील यांनी मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी सोबत बोलतांना माहिती दिली या बद्दल सुज्ञ नागरिकांनी मंडे टू मंडे न्यूज चे आभार व्यक्त केले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!