भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

तांदलवाडीतील केळी उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर.मंडे टू मंडे वृत्तसेवा। तांदलवाडी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० वर्षी वादळामुळे झालेल्या केळी पिकाच्या नुकसानी पोटी भरपाई मिळण्यासाठी विमा कंपनी कडून विमा काढला होता तसेच विमा कंपनी प्रतिनिधीने या नुकसानीची भरपाई मिळणेसाठीच्या पंचनामे करण्यासाठी वेगळी रक्कम (चौदा लाख रूपये ) घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. मात्र केळी पिकाचे नुकसान होऊन देखील रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

२०१९-२० साली झालेल्या वादळाचे पंचनामे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी मुंबई मार्फत केलेल्या या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची विमा रक्कम आजपावेतो त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यासंदर्भात विमा कंपनी प्रतिनिधी कुंदन बारी व त्यांचा एजंट मयूर पाटील यांचेशी या शेतकऱ्यांनी वेळोवेळी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून विमा कंपनी आणि ज्यांनी पंचनामे केले ते कंपनी प्रतिनिधी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या त्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे

भूषण चौधरी, कन्हैया महाजन, अमोल महाजन निखिल महाजन, किरण पाटील,श्रीकांत चौधरी सर्व रा तांदलवाडी ता रावेर यांसह ७५ शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी जळगाव, रावेर कृषी अधिकारी, तसेच तहसीलदार रावेर निंभोरा पोलिस ठाणे यांना दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार,कृषीमंत्री दादा भूसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू,गुलाबराव पाटील, आदींनाही निवेदन दिले आहे.लोकप्रतिनिधी, प्रशासनाने यांत वेळीच लक्ष घालून नुकसान भरपाई ची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून द्यावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!