खिर्डी सह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ,ता.रावेर ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी सह परिसरातील शेत शिवारात बऱ्याच दिवसंपासून पावसाने दडी मारल्याने काल मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटात पुन आगमन झाले असून या परिसरात शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.खिर्डी परिसरासह निंबोल , ऐनपुर या भागात सुध्दा खूप जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आहे. रावेर तालुक्यात गेल्या महिन्याभरात पाऊस नव्हता पण नंतर जोरदार पावसाने अजून जोर पकडल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर आसमानी संकट उभे आहे.
तसेच गेल्या दोन ते तीन महीन्या आधीच पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या भागातील केळी पिक पडल्यामुळे शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. परंतु राज्य शासनामार्फेत अद्यापही मदत मिळाली नाही.तसेच काही शेतकऱ्यांचे पीक विमे मिळाले नाही.त्यामुळे शेतकरी बँक व विमा कंपन्यां कडे मागणी लावुन धरली असुन शेतकऱ्याचे कैवारी तालुक्यात नसल्याने पंचनामे देखील नाममात्र झालेले दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते , पालकमंत्री ‘ स्थानिक आमदार यांनी दिलेले आश्वासन कागदावरच राहीले आहे. सध्या शेतकरी वर्गास कपाशीचे ७ हजारा पर्यंत भाव मिळतील ही आशा वाटत असतांनाच पाऊस जोरदार येत असल्यामुळे पिकाचे नुकसान होत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कपाशी,उडीद,सोयाबीन,मुंग हे खराब होतील या चिंतेत शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसला आहे.तसेच केळी पिकावर सुध्दा सीएमव्ही वायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आज घडीला मेटाकुटीस आला आहे. तसेच रासायनिक खतांचे व बि बियाण्यांचे भाव वाढल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून हवालदिल झाला आहे.