खिर्डी- ऐंनपुर परिसरात अवैध गुटखा विक्री जोमात,अन्न- औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर ,विशेष प्रतिनिधी। सध्या जळगांव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून याबाबत शासनाकडून कठोर निर्बंध देखील घालून दिले आहेत. कोरोना बाबत कठोर निर्बंध तर बंदी असलेल्या गुटख्या बाबत का नाही?
बऱ्याच वर्षांपासून पानटपरीवर, पान मसाला, गुटखा विक्रीस बंदी आहे. तर नागरिकांना देखील सार्वजनिक ठिकाणी थुकंण्यास मनाई करण्यात आली आहे.असे असतांनाही रावेर तालुक्यातील ऐंनपुर खिर्डी या गावा लगतच्या सर्वच परिसरामध्ये गुटखा खुलेआमपणे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे.आजूबाजूच्या गावासह किराणा दुकानांमध्ये देखील गुटखा अगदी सहजपणे विक्रीकरिता उपलब्ध होत आहे. या खुलेआम गुटखा विक्री व्यवसायावर प्रशासनाचा वचक नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जात नसल्याने गुटखा बंदी ही केवळ नावापुरतीच उरलेली आहे का?असा प्रश्न सुध्दा नागरिकांना पडत आहे. अद्यापही आज पर्यंत गाढ झोपेत असलेल्या अन्न व औषधी प्रशासनाने कोणतीही कारवाई या भागात केल्याचे अद्यापही निर्दशनास येत नाही.आर्थिक हित संबंधांमुळे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी परीस्थिती असल्याने कारवाई करणार तरी कोण? या बाबत सम्बधितांना गुटखा विक्रेत्यांकडून नियमित ” पाकीट ” पोहचत असल्याचे सांगितले गेले,त्या मुळे कारवाई करणार कोण? अशी चर्चा सुज्ञ नागरिकांत होत आहे.