“मंडे टू मंडे” चा इम्पॅक्ट : खिर्डी येथील लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर..प्रशासनाने घेतली दखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी,ता.रावेर,भीमराव कोचुरे । खिर्डी येथील गावठाण मध्ये अनेक वर्षापासून गोरगरीब लोक अतिक्रमण करून वास्तव्य करीत आहे.गोर गरीबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असली तरी खिर्डी येथील लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्राम पंचायत प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते.परंतु घरकूल योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते.
लाभार्थ्यांनी आपली कैफियत मांडली असता या बाबत ” मंडे टू मंडे ” ने ” खिर्डी येथील लाभार्थ्यांना घरकूल मिळणार कधी?ग्रामस्थांचा सवाल” या मथळ्याखाली ३० जानेवारी रोजी वृत्त दिले होते.या वृत्तामुळे निवांत झोपलेल्या अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली असता त्यांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधल्यानंतर प्रलंबित घरकूल प्रकरण मार्गी लागले असून या करिता ग्राम पंचायत प्रशासनाने सदर प्रकरण मार्गी लावण्यासाठी घरकूल लाभधारकांचे कागदपत्रे जमा करण्याचे काम सुरू केले आहे.तसेच एस्सी एसटी यांचे ८ तर इतर यांचे ४ लाभ धारकांची निवड करण्यात आली असल्याचे ग्राम विकास अधिकारी गोकुळ सोनवणे यांनी ” मंडे टू मंडे न्यूज ” शी बोलताना माहिती दिली.तसेच ग्रामस्थांनी मंडे टू मंडे न्यूज चे आभार व्यक्त केले.