खिर्डी खुर्द येथील व्यापारी इम्रान शेख यांच्या कडून ग्राम पंचायतीला शीत शवपेटी भेट
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता रावेर,मंडे टू मंडे, प्रतिनिधी। शेख कमर शेख हसन यांच्या स्मृती प्रित्यर्थ खिर्डी येथील दानशूर व केळी, कापूस व धान्य व्यापारी शेख इम्रान तसेच त्यांचे भाऊ शेख रईस, शेख फारूक,शेख फरीद,शेख इरफान,शेख मोसीम,शेख आमीन, यांच्या वतीने शनिवार रोजी शीत शवपेटी खिर्डी खुर्द ग्राम पंचायतीला देऊन ग्रामस्थांची समस्या दूर केली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे गावात कौतुक केले जात आहे.
शव अधिक काळ टिकून राहावे व शितपेटीत बंद असावे . अडीअडचणीचे वेळी गरजूंना याची मदत व्हावी या उद्देशाने शवपेटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला.या शवपेटीचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले.ही शवपेटी ग्राम पंचायत च्या ताब्यात देण्यात आली असून या ठिकाणाहून गरजूंना पुरविले जाणार असल्याचे सरपंच यांनी सांगितले आहे. या वेळी खिर्डी खुर्द येथीप सरपंच राहुल फालक, उपसरपंच पुष्पाबाई पाटील,ग्राम विकास अधिकारी गोकुळ सोनवणे,सदस्य ज्योती कोळी,सुषमा महाजन,अनिस बी पिंजारी,उज्जवला लढे,जयश्री कोचुरे,प्रवीण बढे,सतीश, फेगडे,रवींद्र कोचुरे,प्रवीण चौधरी तसेच माजी उपसरपंच अलताफ बेग,निळकंठ बढे,प स सदस्य दिपक पाटील,विलास पाटील,साबीर बेग,याकूब बेग,जाबीर बेग,साजिद खान,दुर्गादास बोंडे, शेख कय्युम,राजू महाजन,प्रल्हाद कोचुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.