भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अंगणवाडीत लहान मुलांना मिळतो निकृष्ट दर्जाचा पोषण आहार,रावेर तालुक्यातील प्रकार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीच्या माध्यमातून गरोदर महिलांना तसेच सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील मुलांना कच्चा स्वरूपातील कडधान्य देण्यात येते.मुलांची प्रतिकार शक्ती कमी असते यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे गरजेेचे असते.

रावेर बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणा-या अंगणवाडयांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार देणे गरजेचे असताना सुध्दा पुरावठादारांकडून निकृष्ट दर्जाचा पोषण आहार अंगणवाड्यांना मिळत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.लहान मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे तसेच गर्भवती महिलांना,स्तनदा माता यांना योग्य आहार तसेच विविध पोषक घटक मिळावेत यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडयांना शासनाच्या वतीने सकस पोषण आहार दिला जातो. यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत जिल्हा परिषदेला कोटयावधीचा निधी देण्यात येतो.मात्र अंगणवाडयांना पोषण आहारात तांदूळ, मटकी, हरभरा, मुंगडाळ आदि कडधान्य दिले जाते.अतिशय निकृष्ट दर्जाचे व बेचव असुन यामध्ये छोटे छोटे खडे, काडी, कचरा, सोनकीडे निघत आहे. तसेच मिरची पावडर सुध्दा वापरण्या योग्य नसते या सारखे मुदत संपलेले साहित्य दिले जात असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्याने कारवाईची मागणी होत आहे. तसेच पुरवठादाराने साहित्याचा पुरवठा दर महिन्याला करणे आवश्यक असतांना तीन महिन्यांचा एकदाच पोषण आहार संबंधित अंगणवाडयांना वितरीत केला जातो. लहान मुलांना पोषण आहार देताना त्यातील पौष्टिकता प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून देणे बंधनकारक असतांनाही पुरवठादारांकडून हा नियम धाब्यावर बसवून निकृष्ट दर्जाचा आहार वितरीत केला जात असल्याने लहान मुलांना मिळालेल्या पोषण आहारावरून लक्षात येत आहे.तसेच पोषण आहार खराब येत असल्याच्या तक्रारी यापूर्वी सुध्दा प्राप्त झाल्या आहेत. परंतु तक्रारी केल्यानंतर तात्पुरती सुधारणा करण्यात येत असून. पुन्हा जैसे थे ची परिस्थिती पहावयास मिळते या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा पोषण आहारातून विषबाधेसारखे प्रकार घडून एखादी दुर्देवी घटना झाल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालकांना पडला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!