भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर पंचायत समिती मध्ये झालेल्या ऑनलाईन सभेत निधी वाटप आराखडा अखेर रद्द

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर पंचायत समीतीच्या 15 व्या वित्त आयोग आरखडा हा मंत्रालयातुन ग्राम विकास उप सचीव प्रविण जैन यांनी पत्र पाठवुन रद्द केला आहे.

येणारा निधी सर्व 12 सदस्यांनी समसमान प्रभागातील कामासाठी सर्व प्रभागाचा अधिकार असुन वाटपाची प्रक्रीया योग्य पद्धतीने व्हावी यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी जळगाव व रावेर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी लक्ष दयावे अशी सुचना करण्यात आली होती यावेळी जळगाव जिल्हयाचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे व रावेरचे आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या योग्य अश्या नियोजनबद्ध खेळी करत राज्याचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून रावेर पंचायत समिती मध्ये भाजपचे सभापती उपसभापती व दोन भाजप सदस्य यांनी जवळ पास 1 कोटी 28 लाख रुपये आपल्या प्रभागात विकासकामे करण्यासाठी वाटप करण्याचा डाव होता तर चार पंचायत समिती सदस्य यांना 28 लाख रुपये प्रभागात विकास कामासाठी दिले असुन तर भाजपचे माधुरी नेमाडे , योगेश पाटील, योगीता वानखेडे व प्रतिभा बोरोले यांना कोणताही प्रकारचे येणारा निधी न देता त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे पंचायत समीती सदस्य यांनी व सोबत तिघांनी केला असुन त्यामुळे हा 1 कोटी 56 लाख रुपये 15 व्या वित्त आयोगाचा आराखडा रद्द करण्यात यावा यासाठी आम्ही ग्राम विकास मंत्रालय या बद्दल पत्रक पाठविले होते तसेच झालेला प्रकार लक्षात आणुन देत त्यात गेल्या आठवड्यात भाजपच्या सभापती , उपसभापती व दोन सदस्य यांनी केलेल्या प्रकार जसे त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी जवळपास 70 टक्के निधी हा वळविल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य योगेश पाटील व सोबतच्या सदस्यांनी केलेली तक्रार ग्रामविकास मंत्री, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व रावेर BDO यांना केलेली तक्रार त्या अनुषगांने हे पत्रक काढण्यात आल्याचे होते आमचा कोणताही वैयक्तीक पातळीवर व्देष नसुन फक्त 12 पंचायत समीतीच्या सदस्यांना समसमान निधी मिळावा ह्या अनुषंगाने आम्ही हा निधी रद्द करावा हाच उद्देश आहे योगेश सोपान पाटील यांनी भ्रमण ध्वनी द्वारे माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!