खिर्डी खु येथील हौद घाणीच्या विळख्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथील बलवाडी रस्त्यालागत असलेल्या श्रीकृष्ण मंदिर समोर गुरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधण्यात आला असल्याने त्या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य झाले असल्याने या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत आहे.तसेच या परिसरात दुर्गंधी पसरत आहे या बाबत परिसरातील नागरिकांच्या आरोग्यचा प्रश्न नेहमी उद्भवत असतो.
सध्याची परिस्थिती पाहता कोरोना सारखा महाभयंकर आजाराने गेल्या वर्षभरापासून सर्वांना भंडावून सोडले आहे त्यातच आजूबाजूला असलेली घाण जनतेच्या जीवावर बेतू शकते या बाबत ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.तसेच श्रीकृष्ण मंदिर परिसरातील गुरांचा पाणी पिण्याचा हौदात देखील शैवाळ व दगड विटा यामुळे अतिशय खराब झाल्याने त्यात येणारे स्वच्छ पाणी हे नेहमी गढूळ होत असते.तसेच या हौदाची वेळो वेळी स्वच्छता केली जात नसल्याने त्याची दुर्गंधी येत असल्याने या ठिकाणी गुरे पाणी पीत नाही तसेच काही तहानलेली गुरे ही नाईलाजाने पाणी पीत असल्याकारणाने त्याना वेगवेळ्या आजराला देखील समोर जावे लागते या बाबत देखील पशुपालकांची व नागरिकांची ओरड असते तसेच हा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा व हौद देखील वेळी वेळी धुऊन भरण्यात यावा तसेच या प्रकाराकडे ग्राम पंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देवून हौदाची साफ सफाई करावी अशी मागणी पशुपालकांनी व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.