बलवाडी,पुरी, तांदलवाडी परिसरात कृषी पंपांच्या केबल चोऱ्यांचे प्रमाणात वाढ
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,प्रतिनिधी। बलवाडी,पुरी व तांदलवाडी परिसरात कृषी पंप फोडून विहीर व टयुबवेलच्या केबल चोऱ्या सुरूच आहेत यातील तांब्याच्या तार काढून चोरटयांच्या चोऱ्या सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वारंवार केबल चोऱ्या होत असल्याने शेतकरी मोठे त्रस्त झाले आहेत. या चोरटयांना पोलिस प्रशासनाचाही कुठलाही धाक उरलेला दिसत नाही.
शुक्रवारी दि.११च्या रात्री तांदलवाडी शिवारातील (वाघोदा रस्ता) लक्ष्मण महाजन, यांच्या विहारीतील ३० फूट केबल वायर,तर शेखर चौधरी (६०फुट) जगन्नाथ चौधरी (१०फूट)कन्हैया महाजन (१०फूट) यांच्या टयुबवेलच्या केबल वायर कापून चोरून नेल्यात.तर बुधवारी दि.८ च्या रात्री चोरट्यांनी बलवाडी पुरी येथील तापी नदीकाठावरील बॅकवॉटर जवळील सहा कृषी विद्युत पंप फोडून तांब्याच्या तार चोरून नेल्यात.यात चोरटयांनी प्रणव पाटील,महेंद्र महाजन,अरूण महाजन,दिलीप महाजन यांचे एक तर संजय पाटील यांचे दोन कृषी विद्युत पंप फोडून तांब्याच्या तार काढून चोरून नेल्यात.बलवाडी पुरी शिवारातही चौथ्यांदा पंप फोडून या चोऱ्या झाल्या आहेत. चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तांदलवाडी, बलवाडी व पुरी परिसरात सतत केबल वायर व कृषी पंप केबल चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी मोठे धास्तावले असून मोठया आर्थिक संकटात सापडले आहेत.पोलीस प्रशासन काय करतय ? या चोऱ्या थांबणार तरी कधी? असा प्रश्नही निर्माण झाला आहे. या चोरटयांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.