खिर्डी खु.येथे अवैध गावठी दारू विक्री बंद आहे का सुरू? ग्रामस्थांमध्ये संभ्रम
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर, प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डी खु या गावात अनेक महिन्यांपासून अगदी खुलेआम गावठी दारुची विक्री बसस्थानक परिसरात सुरू होती.गावठी हातभट्टीची दारू पिऊन अनेक तरुण सुजून फुगून मरण पावले असून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. मात्र, प्रशासन आर्थिक चिरीमिरीच्या लोभापायी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या बाबत खिर्डी खु येथील महिलांनी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी गावठी दारू विक्री बंद करण्यात यावी या बाबत ग्राम पंचायत कार्यालयात पोलीस प्रशासन आणि गावातील महिला, पोलीस पाटील,दारूबंदी कमिटी सदस्य यांची बैठक घेऊन त्या ठिकाणी पोलिसांना निवेदन देण्यात आले होते.याचा सकारात्मक परिणाम होऊन बसस्थानक परिसरात होणारी दारू विक्री बंद करण्यात आली.मात्र बलवाडी रस्त्याच्या बाजूला अनेक दिवसांपासून गावठी दारूच्या पन्यांचा खच पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.या सर्व प्रकारावरून असे निदर्शनास येते की,गावात दारू विक्री बंद आहे का सुरू?तसेच गावठी दारुच्या पंन्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात खच पडला कसा?असा प्रश्न सुज्ञ नागरिकांसह महिलांना पडला आहे.