खिर्डी बु. बसस्थानक परिसरात फुटलेला धापा त्वरित दुरुस्त करा-मागणी, ग्रा.पं.चे दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। खिर्डी बु येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या आणि खिर्डीमधून ऐनपूर कडे जाणारा मेन रस्त्यात मोठ्या गटारीवर असणारा बस स्टँड जवळील सद्गुरू कापड दुकाना समोरील धापा बरेच दिवसापासून एका साईड ने फुटलेला असून अत्यंत वाईट स्थितीत दिसून येत आहे.
तसेच या रस्त्याने मोटर सायकल, बैलगाडी, चारचाकी वाहने यांची ये जा सुरू असल्याने या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा अपघात घडू शकतो याची पूर्ण जाणीव असूनही ग्रामपंचायत प्रशासनास काही एक देणे घेणे नाही यावरून चित्र दिसत आहे. परिणामतःमोठे वाहनधारकांना तो रस्ता बदलून गावाला वेढा देऊन यावे लागते या रस्त्याकडे ना…ग्रामसेवक ना…ग्रामपंचायत कोणीच लक्ष द्यायला तयार नाही ? प्रशासन अपघात ,गाडीचे नुकसान होण्याचे वाट पाहत आहे का?अपघात झाल्यावर लक्ष देणार आहे ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे.या कडे ग्रामस्थांनचे लक्ष लागून आहे.सदरील धापा लवकरात लवकर तयार करून ग्रामस्थांच्या चिंतेचे निरासन येत्या 5 दिवसात झाले नाही तर पत्रकार संघ व ग्रामस्थ आंदोलन करतील.अशी प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली आहे.
प्रतिक्रिया.
खिर्डी बु.ग्रामपंचायत प्रशासन पूर्ण:तहा नागरिकांना सुविधा देण्यास दुर्लक्ष करीत आहे.
सरपंच, सदस्य हे रोज रस्त्याने जात येत असतात तरी त्यांना 15 दिवसापासून ढापा फुटल्याचं दिसत नाही.माहिती किंवा न दिसल्यासारखं काना डोळा करून निघून जातात.
ग्रामविकास अधिकारी तर फक्त ऑफिस मध्ये बसून सर्व गावाचा कारभार बघतात.. प्रत्यक्ष नागरिकांना काय समस्या आहेत. आपण काय उपाय योजना करू शकतो. असं कृतीत मात्र काही दिसत नाही.प्रश्न विचारलं तर दुसऱ्या गावाचा पण ऐडिशनल चार्ज असल्याचं सांगून वेळ मारून नेतात.
सामाजिक कार्यकर्ते–विनायक जहुरे