खिर्डी – बलवाडी रस्त्यावर घाणीचे साम्राज्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,भिमराव कोचुरे। खिर्डी खु येथून जाणाऱ्या बलवाडी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या कचऱ्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.तसेच या ठिकाणी गुरांचे मलमुत्र, तसेच वाया गेलेला चारा, व टाकाऊ वस्तू प्लास्टिक पिशव्या,मृत झालेल्या कोंबड्या टाकल्या जात असून या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे.त्यामुळे वायू प्रदूषणाची धग वाढत चालली आहे.रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होत असून शेजारीच राहत असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.तसेच महाराष्ट्रात हाहाकार माजवलेल्या कोरोना महारोगाचा प्रादुर्भाव वाढत असून या परिसरात स्वच्छ करणे गरजेचे असून सदरील कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.