अस्कॅड योजनेअंतर्गत रावेर पशुसंवर्धन विभागा तर्फे किसान क्रेडिट कार्ड जागरूकता अभियान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर, प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील कांडवेल येथे अस्कॅड योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभाग यांच्या माध्यमाने किसान क्रेडिट कार्ड जागरूकता अभियान व चर्चासत्राचे आयोजन रावेर तालुक्यात प्रथमतः च सभापतींच्या आग्रहास्तव कांडवेल येथे करण्यात आले.किसान क्रेडिट कार्ड हे शेती, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायासाठी वापर करू शकतात,क्रेडिट कार्ड चे फायदे, क्रेडिट कार्ड कशासाठी आहे ,विविध विषयांवर जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर अरुण प्रकाश साहेब यांनी प्रकाश टाकला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ कविताताई कोळी,कांडवेल च्या सरपंच,पंचायत समितीचे सदस्य दीपक संतोष पाटील,कांडवेल येथील सामाजिक कार्यकर्ते हरलाल भाऊ कोळी तसेच जिल्हा अग्रणी बँकेचे मॅनेजर अरुण प्रकाश साहेब, नाबार्डचे झांबरे साहेब , जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एस वि शिसोदे साहेब, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर पीसी शिरसाट, तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सौ कविताताई कोळी यांच्या हस्ते पशूपालक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचे अर्ज वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी, कांडवेल परिसरातील शेतकरी बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांच्या व्यवस्थापनासाठी तीन लाख रुपये पर्यंतचे खेळते भांडवल उपलब्ध होण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजनेचा जास्तीत जास्त पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री झांबरे साहेब तसेच जिल्हा अग्रणी बँकेचे श्री अरुण प्रकाश साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पशुधन विकास अधिकारी डॉक्टर रणजीत पाटील यांनी केले व डॉक्टर एस के शेळके मान्यवरांचे आभार मानले.