वडगांव येथे नेचर हार्ट फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र मार्फत महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। भारत सरकारच्या व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व नेचर हार्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता पखवाडा निमित्त वडगाव ता. रावेर येथे महात्मा गांधी ग्राम स्वच्छता अभियान घेण्यात आले.स्वच्छता अभियान प्रसंगी संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आले. त्यात ग्रामपंचायत परिसर,हनुमान मंदिर,जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा,मज्जिद परिसर,विठ्ठल मंदिर परिसर,सामाजिक सभागृह परिसर,बुद्ध विहार स्वच्छ करण्यात आले.सदरील कार्यक्रम प्रसंगी वडगाव गावचे पोलीस पाटील संजय वाघोदे यांनी युवकांना मार्गदर्शन करतेवेळी म्हणाले की ज्या पद्धतीने आपण आपले गाव स्वच्छ करीत आहोत त्याच पद्धतीने आपण आपले विचार व आपले शरीर देखील स्वच्छ ठेवले पाहिजे. जे युवक व्यसनांच्या अधीन जाऊन स्वतःचे शरीर अस्वच्छ करीत आहेत त्यांनी ती जडलेली व्यसने सोडली पाहिजे. तसेच गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी युवकांनी सहकार्य करणं गरजेच आहे.
तसेच कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नेचर हार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड.शिवदास कोचुरे, उपाध्यक्ष सलमान शेख, वडगाव चे ग्राम विकास अधिकारी संतोष उचित, पत्रकार विनायक जहुरे, अंगणवाडी सेविका इंदुबाई वाघोदे, लताबाई वाघोदे,मायाबाई वाघोदे, त्याचबरोबर बचत गट वर्धनी जयश्री वाघोदे, सुषमा वाघोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नेहरू युवा केंद्र जळगाव चे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य तथा नेहरू युवा केंद्र रावेर तालुका समन्वयक आनंद वाघोदे, मुस्कान फेगडे यांनी काम पाहिले.स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी बलवाडी येथील भूषण ठाकरे, रझोदा येथील बजरंग दलाचे सदस्य केतन लिधुरे, वडगावचे सचिन वाघोदे, प्रशिक वाघोदे, सुरेश वाघोदे, अक्षय वाघोदे,निलेश वाघोदे, गोविंदा वाघोदे,पंकज वाघोदे, नितीन वाघोदे किशोर लहासे भावेश वाघोदे,अतिश वाघोदे, गौरव वाघोदे, रोहित वाघोदे यांनी परिश्रम घेतले. व कार्यक्रमाचे आभार फाउंडेशन चे उपाध्यक्ष सलमान शेख यांनी मानले