मंडे टू मंडे इंपॅक्ट: खिर्डी येथे रस्त्याचे काँक्रीटीकरण काम आज झाले सुरू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे,प्रतिनिधी। तालुक्यातील खिर्डी खु येथील बाजार पट्टा भागातून बलवाडी सह राज्य महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असून आठवडा बाजार पेठ परिसरातील रस्त्याला खोलगट खड्डे पडले होते तसेच १०० मीटर पर्यंत पूर्ण रस्त्यावर ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असे यामुळे ग्रामस्थांना व वाहन धारकांना या ठिकाणाहून पायी चालणे सुद्धा अवघड होते.
याबाबत खिर्डी येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी यांचे कडे आपली कैफियत मांडली असता सदरील रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत काँक्रीटीकरण मंजूर झाले परंतु इस्टीमेट मध्ये फक्त ७ मीटर रुंदीचे काँक्रीटीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते.सदरील कामाला २ फेब्रू.रोजी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असता सदरील काम आठ ते दहा दिवसापासून बंद करण्यात आले होते. ” इस्टीमेट अभावी काँक्रीटीकरण रखडले ” या मथळ्याखाली ८ फेब्रुवारी ला ” मंडे टू मंडे” ने वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताची दखल घेत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सदरील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता इस्टीमेट मध्ये काम वाढविण्यात यावे व त्यानुसार काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशा सूचना कार्यकारी उप अभियंता रावेर यांना केल्या असता संबंधित ठेकेदार यांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली त्यानुसार आज खिर्डी ते बलवाडी रस्त्याचे १०० मीटरचे काँक्रीटीकरण एक साईड करण्यात आले.