मंडे टू मंडे इम्पॅक्ट ; खिर्डी खु येथील हौदाची ग्राम पंचायत प्रशासनाने केली साफसफाई..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। ” खिर्डी खु येथील हौद घाणीच्या विळख्यात” या मथळ्याखाली “मंडे टू मंडे ” ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केले होते या वृत्ताची ग्राम पंचायत प्रशासनाने दखल घेत संबंधित कर्मचारी यांना त्वरित हौदाची साफ सफाई करण्यात यावी अशा सूचना देवून काही तासाच्या आत ग्राम पंचायत कर्मचारी यांनी व्यवस्थित रित्या साफसफाई करण्यात आली.
सदर ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर परिसरातील गुरांना पाणी पिण्यासाठी एकमेव हौद असल्याने हौदाचे पाणी नेहमी शैवाळ युक्त गढूळ पाणी असल्याने याठिकाणी गुरे पाणी पिण्यास धजावत नव्हते,मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता,शैवाळ व दगड विटा यांचा खच पडलेला दिसला पाणी अतिशय खराब झाल्याने त्यात येणारे स्वच्छ पाणी हे नेहमी गढूळ होत असे तसेच या हौदाची वेळो वेळी स्वच्छता केली जात नसल्याने त्याची दुर्गंधी येत असल्याने या ठिकाणी गुरे पाणी पीत नव्हते तसेच काही तहानलेली गुरे ही नाईलाजाने पाणी पीत असल्याकारणाने त्याना वेगवेळ्या आजराला देखील समोर जावे लागत होते.ग्रामपंचायत प्रशासनाने लागलीच हौदाची साफसफाई केल्याने ग्रामस्थां मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.