” मंडे टू मंडे इम्पॅक्ट” उदळी ते हतनूर रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजविले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,भिमराव कोचुरे। 1 जानेवारी रोजी ” उदळी ते हतनूर रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य” या मथळयाखाली “मंडे टू मंडे ” ने बातमी प्रकाशित केली होती या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी उपअभियंता सावदा यांनी त्वरित दखल घेवून संबंधित ठेकेदार यांना रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच संबंधित ठेकेदाराने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम त्वरित सुरू करून काम पूर्ण करीत आहे.या भागातील वाहनधारकांनी व नागरिकांनी केलेली मागणी नुसार रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात आल्याने समाधानी झाल्याने त्यांनी ” मंडे टू मंडे न्यूज” चे आभार व्यक्त केले