भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत ग्रामसुरक्षा पथकाची स्थापना

मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा।

खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी जळगांव जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचे आदेश दिले असून या आदेशाचे पालन करीत निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील निंभोरा बु,विवरा बु, खिर्डी खुर्द,व बुद्रुक, ऐंनपुर, तांदलवाडी, आंदलवाडी, यांसह संपूर्ण २९ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून एकूण ४०६ ग्राम सुरक्षा सदस्यांची नोंदणी करण्यात आली आहे.तसेच नुकतीच निंभोरा पोलिस स्टेशनला पोलिस पाटील व ग्रामसुरक्षा पथकाच्या सदस्यांची बैठक घेतली.

गावात गस्त घालणे, छोट्या मोठ्या चोऱ्या, शेतमालाच्या चोऱ्या थांबविण्याकरिता रात्री गस्त घालणे यांसह सण उत्सव,अपघाताचे वेळी पोलिसांना मदत करणे या बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.तसेच सदर बैठकी दरम्यान ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. या प्रसंगी मा.कुणाल जी सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर भाग,तसेच निंभोरा पो.स्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, डिगंबर चौधरी तंतमुक्ती समिती अध्यक्ष,प्रल्हाद बोंडे, यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करण्यात आले.सदर बैठकीस पोलिस पाटील यांच्यासह ग्राम सुरक्षा पथकाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्राम सुरक्षा पथक स्थापन करणे कामी पोलिस नाईक स्वप्नील पाटील, होमगार्ड अमोल अंजनसोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!