तांदलवाडी येथील तरुणाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। येथुन जवळच असलेल्या तांदलवाडी येथील तरुणाचा विहीरीत बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि २७) रोजी घडली. पवन प्रकाश पाटील (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. येथील नवीन बसस्थानक परिसरातील आदर्श नगर मधील रहिवासी प्रकाश पाटील यांचा तो मुलगा होता.
पवन पाटील हा मंगळवार दि २६ रोजी दुपार पासून घरून बेपत्ता झालेला होता. पवनचा शोध घेतला असता बुधवारी सकाळी ७ वाजेदरम्यान तांदलवाडी शिवारातील शेत गट नं. ६३९ मधील विहीरीत पवनचा मृतदेह आढळून आला. याबाबत कल्पेश महाजन यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पवनने आत्महत्या केली की काय ? याबाबत पोलिस पुढील तपास करीत आहेत. मयताचे ग्रामीण रुग्णालय रावेर येथे शवविच्छेदन करून दुपारी तांदलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. २० दिवसांपूर्वीच मयत पवनचे वडील प्रकाश पाटील यांचे दिर्घ आजाराने निधन झाले होते. त्याच्या पश्चात आई व तीन बहीणी असा परिवार आहे.