खिर्डी खु येथील विटभट्टी चालकास प्रशासनाचा अल्टिमेटम,कारवाई करणार का पाठीशी घालणार?
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। खिर्डी खु येथील ग्राम पंचायत हद्दीतील शिवारातील गट नंबर २२४ या जागेत विना परवाना विटभट्टी व्यवसाय सुरू असून विटभट्टीसाठी लागणाऱ्या दगडी कोळशाचा बारीक चुरा आणि भट्टीतील राख विटभट्टी कामगारांमार्फत खिर्डी ते निंभोरा या मुख्य रस्त्याच्या अगदी जवळ चाळणी द्वारे चाळत असल्याने हवेमुळे राखेचे व दगडी कोळशाचे बारीक कण व धूळ रस्त्याने पायी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या आणि वाहन चालकांच्या डोळ्यात जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबत विटभट्टी चालकास दोन वेळा तोंडी समज देवून ही कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेतल्याने या बाबत मंडे टू मंडे न्यूज ने २एप्रिल २०२२रोजी खिर्डी येथील विटभट्टीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, महसूल विभागाचे दुर्लक्ष या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती.या बातमीची वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेत सदरील विटभट्टी चालकास वरिष्ठांच्या आदेशान्वये खिर्डी खु.येथील तलाठी सजाचे तलाठी हेमंत जोशी यांनी खिर्डी येथील विटभट्टी चालकास येत्या तीन दिवसात परवाने तलाठी कार्यालयात जमा करण्याबाबत अल्टिमेटम दिला असून या व्यतिरिक्त महसूल प्रशासन व स्थानिक ग्राम पंचायत प्रशासन विटभट्टी चालकांवर काय कारवाई करतील का पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार या कडे सुज्ञ नागरिकांसह वाहन धारकांचे लक्ष लागून आहे