खिर्डी खु येथील रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम अपूर्ण.सा.बां.विभागाचे दुर्लक्ष
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। खिर्डी खु येथील आठवडे बाजार परिसरातून बलवाडी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे शंभर मीटर काँक्रीटीकरण काम मंजूर होवून एक साईड चा रस्ता दोन ते तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला आहे.
परंतु संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेल्या काही दिवसांपासून दुर्लक्ष होत असल्यामुळे सदरील रस्त्याची एक साईडचे काँक्रीटीकरण चे काम रखडले असल्यामुळे पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे तसेच गटारीचे पाणी साचत असून या रस्त्यावरून पायी चालणे कठीण होते तर वाहन चालवणे किती जिक्रीचे ठरत असेल.तसेच सदर ठिकाणी पाणी तुंबल्याने रस्ता न दिसल्यास साईड देण्याच्या नादात मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या कडे सा.बां.विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देवून त्वरित रस्त्याचे काँक्रीटीकरणचे काम मार्गी लावण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.