भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

नुकसानग्रस्त केळी उत्पादकाना त्वरित मदत मिळावी-पं.स.सभापती कविता कोळी यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी..

Monday To Monday NewsNetwork।

खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। दि.२७ मे २०२१ रोजी रावेर तालुक्यात झालेल्या चक्री वादळामुळे शेतकऱ्यांचे केळी बागांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे.केली बागा कापणीवर आलेल्या असतांना वादळी पावसामुळे पूर्ण कोलमडून पडल्या आहेत.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वादळाने हिरावून घेतला आहे.पेरणी चा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना शेती मशागत,बी बियाणे, खरेदी कमी पैशाची चणचण भासत असल्याने त्यात पाऊस वादळामुळे अतोनात नुकसान झाले.त्यामुळे त्यांना वैयक्तिक रोख आर्थिक मदत मिळावी व सर्व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात-लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी.

तसेच पडलेले केळीचे खोड उचलणे कामी रोजगार हमी योजने अंतर्गत उचलण्यात यावे जेणे करून त्यांना या कठीण समयी मदत केल्यासारखे होईल.त्याचप्रमाणे वादळामुळे तालुक्यातील काही गावामध्ये घरांचे फार मोठया प्रमाणात पडझड होऊन नुकसान झालेले आहे काही कुटुंबाचा संसार उध्वस्त होऊन उघड्यावर आलेले आहेत. त्यामुळे त्यांना त्वरित वैयक्तिक लक्ष देऊन मदत करण्यात यावी तसेच नुकसान ग्रस्त यांची नावे घरकुल यादी मध्ये समाविष्ट करून घरकुल योजनेचा त्वरित लाभ द्यावा.अशी मागणी रावेर पंचायत समिती सभापती कविता हरलाल कोळी यांनी मा.जिल्हाअधिकारी जळगाव यांना निवेदनाद्वारे केली. त्या प्रसंगी उपस्थित मा.मंत्री आमदार गिरीश महाजन,जिल्हा अध्यक्ष भाजपा राजुमामा भोळे,आमदार संजय सावकारे,जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,धामोडी ग्रा.प. सदस्या स्विटी पाटील सामाजिक कार्यकर्ते हरलाल कोळी दुर्गेश पाटील आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!