ग्राम पंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सौर पथदिव्यांचे वैभव संपले
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। राज्य शासन सौर ऊर्जेविषयी विविध प्रकारच्या योजना राबवत आहे.पण याच्या उलट चित्र खिर्डी या गावात पाहायला मिळत आहे.जल विद्युत, औष्णिक विद्युत या सारख्या स्रोतांद्वारे मिळणाऱ्या विजेचा वापर कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या सौर दिव्यांची सध्या स्थितीला बिकट अवस्था आहे.
चांगल्या गुणवत्तेचे व नामांकित कंपनीचे सौर पथदिवे खांबावर लटकलेले दिसतात मात्र दिवे बंद असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.ना दुरुस्त झालेल्या दिव्यांकडे ग्राम पंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याने सौरदिव्यांचे वैभव संपले आहे. ग्राम पंचायत प्रशासनाने सौर पथदिवे बसविण्यासाठी लाखो रुपये खर्च केला.पण देखभाल दुरुस्ती अभावी निधी पाण्यात गेल्याचे चित्र दिसत आहे.यावरून स्थानिक प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
या मुळे बंद अवस्थेत असलेले सौर पथदिवे बदलनेही कठीण झाले आहे.यामुळे गाव अंधारात जात आहे.या पेक्षाही महत्वाचे म्हणजे ज्या सौर ऊर्जेला जगाने डोक्यावर घेतले आहे.तिची अशी अवहेलना होत असतांना ग्राम पंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी पाण्यात जात आहे.