भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी सावलीच्या ठिकाणी पाण्याचे भांडे भरून ठेवा, पक्षांची तहान भागवा!

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने पाणवठे कोरडे पडले असून पशू पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यासाठी नागरिकांनी मानवी दृष्टिकोनातून पक्ष्यांनाही पाणी आणि निवाऱ्याचा आसरा देण्यासाठी पाण्याची भांंडी घरटी सावलीच्या ठिकाणी बसविण्यात पुढाकार घ्यावा, असे आव्हान ग्रामीण भागातील पशूप्रेमींकडून करण्यात येत आहे.

पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत असल्याने.अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे, यावर्षी होळीला उन्हाचा पारा वाढताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांना चांगलाच घाम फुटत आहे. पाळीव प्राणी,श्वसन, संस्थेचे आजार पशुपक्ष्यांना होतात. इतर वेळी ग्रामीण भागात उपलब्ध पाणी साठ्यावर पशुपक्षी तहान भागवतात. शारीरिक थंडावाही शोधतात. मात्र वाहणाऱ्या नदी नाल्याचे पाणी पातळी घटत आहे. नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. पाण्याच्या शोधात पक्षी विहार करताना दिसतात. काँक्रिटी करणामुळे जंगलात झाडांची संख्या कमी झालेली आहे.त्यातच नुकतीच पानगळ झालेली झाडे उघडी बोडकी दिसतात. त्यामुळे पुरेशी सावली पशुपक्ष्यांना मिळत नाही. सिमेट, डांबरी रस्त्यामुळे उन्हाचे चटके अधिक जाणवतात. याचा सर्वाधिक त्रास पशुपक्ष्यांना होत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातही घर व परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाणवठे कुत्रिम घरट्याची सोय करावी असे आव्हान पशूप्रेमींकडून करण्यात येत आहे. मार्च महिना अर्धा झाला त्यात उन्हाचा पारा वाढल्याने लाहीलाही होत आहे तरी पशु पक्षासाठी पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पक्ष्यांची तहान भागेल त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे आव्हान पक्षीप्रेमींनी केले आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!