खिर्डीत छुप्या मार्गाने मिळतोय अवैध गुटखा…आदेशाची पायमल्ली, प्रशासनाचे दुर्लक्ष
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर(विशेष प्रतिनिधी)
सध्या राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने प्रशासनाने १५ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला असून या काळात प्रशासनाने काही नियमांच्या आधारे वेळेचे बंधन ठेवून अत्यावश्यक सेवेतील दुकाने,व आस्थापना यांनाच परवानगी देण्यात आली असून. प्रशासनातर्फे कोरोना संबंधी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हान सुध्दा करण्यात आले आहे.ग्रामीण भागात मात्र सर्वच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विमल गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध होत असून लहान गाय छाप पुडी, मोठी पुडी अवैध पणे जास्त भावात मिळत असून एक प्रकारे जनतेची लयलूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच तंबाखू,गुटखा खाणारे गुटखा बहादर सार्वजनिक ठिकाणी कोठेही पिचकारी मारत असतात.त्यामुळे कोरोनाला एकप्रकारे निमंत्रण मिळत असते.यावर सम्बधित प्रशासना कडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होत नसल्यामुळे तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा विक्रीला प्रोत्साहन मिळत आहे.राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानके कायदा’ पायदळी तुडवीत खिर्डी परिसरात अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री केली जाते,
पान टपरीधारक टपरी बंद असल्याने पानटपरी च्या शेजारी हातात पिशव्या घेऊन छुप्या मार्गाने व उघड्यावर गुटखा विक्री सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.खिर्डी परिसरातील प्रत्येक पानटपरीच्या शेजारी हातात पिशव्या घेऊन राजरोजसपणे गुटखा विकला जात असताना गुटखा विक्रेत्यांना सम्बधित प्रशासन अधिकाऱ्याचा आर्शीवाद तर नाही ना? असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये पानटपऱ्या बंद असल्या तरीही छुप्या मार्गाने खिर्डी व परिसरात अवैध गुटखा विक्री सुरूच आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून त्यांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे ,खिर्डी बुद्रुक मधील मराठी शाळेच्या परिसरात व बस स्टँड वरील पानटपऱ्या शेजारी हातात पिशव्या घेऊन उघड्यावर मोठ्या प्रमाणात विक्री करताना दिसतात, सदर प्रतिनिधीने स्टिंग ऑपरेशन करताना दोन वेगवेगळ्या कंपनीच्या गुटख्याच्या पुड्या सहज विकत घेतल्या. त्या ठिकाणी अन्य ग्राहकांना सहजरीत्या गुटखा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे गर्दी पण दिसून आली . हा साठा कुठून येतो हा सर्व सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. अन्य राज्यातून येतोय गुटखा:-
गुटखा व सुगंधित तंबाखू अन्य जिल्ह्यातून खिर्डी परिसरात दाखल होतोय आणि तस्करांच्या माध्यमातून पानटपऱ्यांवर पोहोचतो. गावात लॉकडाऊन असल्यामुळे घरातच गोळ्या बिस्किटे विकण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गुटखा पाकिटे पानटपरी वाले घेऊन जातात.खिर्डी बुद्रुक मधील मराठी शाळेच्या शेजारी त्यांना गुटखा मिळत असल्याचे सदर प्रतिनिधीला दिसून आले. गुटखा विक्रेत्यांवर सम्बधित अधिकारी कारवाई करतील का?या गोष्टी कडे सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.