रावेर तालुक्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेलेल्या सूनोदा येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दि.२८ रोजी घडली.ज्ञानदेव जयराम सपकाळे (वय ६५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की ज्ञानदेव सपकाळे हे नेहमीप्रमाणे शेतीकामासाठी तसेच गुरा ढोरांना चारा आणण्यासाठी सकाळी सायकल घेवून शेतात गेले होते.सकाळी ७ ते ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचे भाऊ सुरेश सपकाळे यांना ते निंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आलेत.त्यांनी ही माहीती घरी कळविली.याबाबत प्रमोद सपकाळे यांच्या खबरीवरून निंभोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या दोन वर्षापासून हंगाम होत नसल्याने सततच्या नापिकीच्या नैराश्यात ज्ञानदेव सपकाळे राहत असल्याचे परिवारातील सदस्यांनी सांगितले.यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी असा परिवार आहेत.याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.