खिर्डी खु.येथे शांतता समितिची बैठक संपन्न, सूचनांचे पालन करा- सपोनि.गणेश धुमाळ
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। खिर्डी खु.येथील ग्राम पंचायत कार्यालयात आज सकाळी १० वाजता निंभोरा पोलीस स्टे.चे सहा.पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.तसेच साजरे होणारे सण व उत्सवाच्या वेळी जोर जोरात ढोल वाजवणे व डॉल्बी साऊंड सिस्टीम वरून मोठ्या आवाजात गाणी वाजविणे,मोठ्या आवाजाचे फटाके वाजविणे,या मुळे ध्वनीप्रदुषण होते.ध्वनी प्रदूषणामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होतो.विशेषतः रात्रीच्या वेळेस लोकांची झोपमोड होते.तसेच वृध्द इसम,आजारी लोक,लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.तसेच सामाजिक सुरक्षिततेचा भंग होत असतो.
ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती
मा.सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन १९८६व ध्वनी प्रदुषण अधिनियम २०००मधील तरतुदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.तसेच रात्री १०वाजता पासून ते सकाळी ६वाजेपर्यंत लाऊड स्पीकर,फटाके,वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे.तसेच कोणीही विना परवानगी लाऊड स्पीकरचा वापर करू नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट वर पोलिसांची बारकाईने लक्ष असल्याचे सांगितले.तसेच कोणतेही सण उत्सव साजरे करताना जातीय सलोखा व शांतता अबाधित राहील अशी ग्वाही सर्व धर्मीय बांधवांनी दिली.या बैठकीत निंभोरा पो.स्टे चे सहा.पोनि गणेश धुमाळ,पोकां स्वप्नील पाटील, सरपंच राहुल फालक,ग्राम विकास अधिकारी दिलीप बारेला, पोलीस पाटील प्रदीप पाटील,नीलकंठ बढे,साबीर बेग अन्वर बेग,दुर्गादास बोंडे,रमेश कोळी,भिमराव कोचुरे,सलीम मण्यार,याकूब बेग कासम बेग,शेख नईम शेख नैय्यर,रवींद्र कोचुरे,शेख काय्युंम शेख नैय्यर,अल्ताफ बेग रहीम बेग, जाकिर पिंजारी,विजय कोचुरे, इसाक पिंजारी,शामराव कोचुरे,आदी मान्यवर उपस्थित होते.