भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

“मंडे टू मंडे इफेक्ट” अवैध विटभट्टी चालकावर ग्राम पंचायत प्रशासनाची दंडात्मक कारवाई

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। खिर्डी ते निंभोरा रस्त्यावरील गट नंबर २२४ या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला विना परवानगी विटभट्टी सुरू असल्याने सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात राख व दगडी कोळशाचा चुरा चाळणी द्वारे चाळत असताना रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांच्या डोळ्यात बारीक चुरा व धूळ उडत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

तसेच पेटत्या भट्टी मुळे विषारी वायूंचे उत्सर्जन होत असून ते मानवाच्या आरोग्यास अत्यंत घातक असल्याने याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून या मुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत असल्याने याबाबत अनेक वेळा संबंधित विटभट्टी चालकास तोंडी समज दिली असता न जुमानता अखेर ग्राम पंचायत प्रशासनाने नोटीस बजावून ग्राम पंचायतीची रितसर परवानगी घेवून आपली विटभट्टी रस्त्या पासून ५० ते ६० फूट अंतर ठेवून लावण्यात यावा अशी सूचना देण्यात आल्या.

तसेच १ एप्रिल रोजी ” मंडे टू मंडे न्युज ” ने या बाबत ” खिर्डी येथील विटभट्टीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात,महसूल विभागाचे दुर्लक्ष” या मथळ्याखाली वृत प्रकाशित केले होते या वृत्ताची दखल घेत खिर्डी खु येथील ग्राम पंचायत प्रशासनाने अखेर विटभट्टी चालकांवर १४०००/- रू दंडात्मक कारवाई करण्यात आली.कारवाई करतेवेळी सरपंच राहुल फालक, ग्रा.वि.अधिकारी दिलीप बारेला,ग्राम पंचायत सदस्य,लिपिक योगेश कोळंबे आदी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!