भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी परिसरात अवैध देशी विदेशी दारूची खुलेआम विक्री कोणाच्या अर्थपूर्ण आशीर्वादातून ?

Monday To Monday NewsNetwork।

खिर्डी ता.रावेर (विशेष प्रतिनिधी)। सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने राज्यासह जिल्ह्यामध्ये प्रशासनाने कडक निर्बंधांसह १जून पर्यंत लॉक डाऊन घोषित केलेला असून खिर्डी परिसरात चक्क प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत अवैध देशी विदेशी दारूची सर्रास पणे चढ्या दराने विक्री केली जात त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच चंगळ होत असून २२००रु मिळणारी दारूची पेटी ४०००रु या दराने विकली जात असल्याने दारू विक्रेत्यांची चांदी होत असून सुगीचे दिवस आलेले आहेत. एकीकडे दारू ची दुकाने बंद असल्याचा दावा करत असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू येते कोठून?असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.तसेच ५०ते६०रु.मिळणारी दारूची बाटली १२०त१५०रु. व १००ते १५०रु मिळणारी बियर चक्क ३५०रु या दराने विक्री केली जात आहे. खिर्डी येथे नागरिकांना एकवेळ चहा मिळणार नाही. मात्र देशी,विदेशी,सर्व ब्रॅण्ड ची दारू हमखास मिळते.तसेच भाजीपाला,फळविक्रेते,किराणा दुकान यांना ७ ते ११ वाजेपर्यंत सुट देण्यात आली आहे. मेडिकल, दवाखाने या सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले असून सुध्दा.अनेक ठिकाणी संचारबंदी व जमावबंदी च्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. संचारबंदी मध्ये अवैध दारू विक्रेत्यांना जणू काही रान मोकळे झाले की काय असे वाटत आहे.

हे सर्व प्रकार माहीत असूनही दुर्लक्ष केले जात आहे.मात्र अवैध देशी,विदेशी मद्य,होम डिलिव्हरी च्या नावाखाली सर्रासपणे बंद गेट आडून चढ्या भावाने विकले जात आहे.शासनाचे नियम व कायदे फक्त सर्व सामान्य जनतेला व कायदेशीर व्यवसायांनाच लागू पडतात का?अवैध देशी विदेशी दारू विक्रेत्यांना कोणत्याही प्रकारचे नियम व कायदे पाळण्याचे बंधन नाही का?या संभ्रमात सर्व सामान्य नागरिक पडले आहेत. संचारबंदी,जमावबंदी ही केवळ एक नंबर व्यवसायांना लागू आहेत.मात्र दोन नंबर अवैध धंदे जीवनावश्यक आहे की,काय? हॉटेल्स,ढाबे, दारू गुत्याच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचे काय? हे सर्व प्रकार माहीत असूनही स्वतः डोळ्याने पाहून सुदधा का दुर्लक्ष केले जात आहे.

दारूबंदी विभागासह पोलीस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसल्याने देशी विदेशी दारू विक्री अगदी खुलेआम सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.अर्थपूर्ण सम्बधातून तर दुर्लक्ष केले जात नाही ना ? संबंधितांकडून असे बोलले जाते की, आम्ही वर पर्यंत सर्वांना हप्ते देतो , अधिकारी येऊन पैसे घेऊन जातात. सम्बधित अधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच हे सुरू असल्याचे सांगितले गेले.
तूर्त एव्हढेच..!

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!