सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेत सहभाग घ्यावा- एपीआय गणेश धुमाळ
खिर्डी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या संकल्पनेतून जळगांव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नागरिकांमध्ये जातीय व सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी निंभोरा गावासह जिल्ह्यातील, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिक पोलीस दलासोबत आहे. हा संदेश देण्याच्या उद्देशाने थेट जातीय व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून
या मोहिमेत निंभोरा गावासह पोलिस स्टेशन हद्दीतील गावाचे सर्व जबाबदार नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला यांनी स्वयंपणे सहभाग घेऊन जातीय व सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी जनजागृती करून जातीय व सामाजिक सलोखा संदर्भात सही आणि संदेश लिहायचे आहेत.
पोलीस दलाच्या या आगळ्यावेगळ्या मोहिमेत सामील होण्यासाठी आपल्याला फक्त पोलीस दलाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बॅनरवर सही करून संदेश द्यायचा आहे.v सदरील स्वाक्षरी मोहीम निंभोरा पोलिस स्टेशन मध्ये बॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी दि. ७ मे २०२२ रोजी सकाळी १० वा.पासून पोलीस दलामार्फत राबवण्यात येणाऱ्या स्वाक्षरी मोहिमेत पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांनी भाग घेऊन सहकार्य करावे,असे आवाहन निंभोरा पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ यांनी केले आहे.