आगामी सण उत्सव काळात शांतता राखावी – स.पो.नि.गणेश धुमाळ
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। आगामी सण उत्सव शांततापूर्ण व आनंदमय वातावरणात साजरे करण्यात यावे तसेच सामाजिक व जातीय सलोखा राखावा. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या मजकूर आणि पोस्टवर निंभोरा पोलिसांचे बारकाईने लक्ष असून कायदा सुव्यवस्था अबाधित राहील व सामाजिक शांतता भंग पावणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टे.चे सहा.पो.नि. गणेश धुमाळ यांनी केले आहे
तसेच सण उत्सव काळात मोठ्या आवाजात डॉल्बी साऊंड सिस्टीमवर गाणी वाजविणे , मोठ्या आवाजाचे फटाके वाजविणे,या मुळे ध्वनिप्रदूषण होत असल्यामुळे लहान मुले, आबाल वृध्द यांना खूप त्रास होतो तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षण कायदा सन १९८६ व ध्वनी प्रदुषण अधिनियम २०००मधील तरतुदीचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत लाऊड स्पीकर, डॉल्बी साऊंड सिस्टीम व कोणत्याही प्रकारचे वाद्य रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत वाजविण्यास बंदी घालण्यात आली आहे.सकाळी ६ ते रात्री १० यावेळेत कोणीही विना परवानगी लाऊड स्पीकर व वाद्य वाजवू नये.तसेच नागरिकांनी शांतता राखून सहकार्य करावे असे आव्हान निंभोरा पोलीस स्टे चे सहा.पो नि गणेश धुमाळ यांनी केले आहे