अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी मिळणार बीज भांडवल योजनेचा आधार
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणे आणि अपंगाना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय, धंदा, उद्योग, शेती पूरक उद्योग, सुरु करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य राष्ट्रीयकृत बॅकेमार्फत परत फेडीच्या कर्जाच्या स्वरुपात बीज भांडवल उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.
योजना या प्रवर्गासाठी लागू आहे:
अंध,अल्पदृष्टि,कर्णबधिर,अस्थिव्यंग व मतिमंद.
योजनेच्या प्रमुख अटी:
विहीत नमुन्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे अपंग किमान 40 टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु 100000/- पेक्षा जास्त नसावे.
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापर्यांत असावे.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप:
या योजने खाली अपंग व्यक्तींना रु 1.50 हजार प्रकल्प खर्चाच्या 20 टक्के अथवा कमाल 30000/- रुपये समाज कल्याण विभागाकडून अनुदान बीज भांडवल स्वरुपात देण्यात येते. उर्वरित 80 टक्के भाग बँकेकडून कर्जाच्या स्वरुपात उपलब्ध होते.
अर्ज करण्याची पध्दत:
विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करणे.
संपर्क कार्यालयाचे नाव:
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सर्व व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर व संबंधीत बँक.