भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी येथे कायमस्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा, संबंधित विभागाचे दुर्लक्ष्य

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर, भिमराव कोचुरे। रावेर तालुक्यातील खिर्डी येथे श्रेणी १ चा सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना असून येथील तत्कालीन पशुवैद्यकीय अधिकारी यांची नाशिक येथे बदली झाल्याने गेल्या ६ ते ७ महिन्यापासून पशुवैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असल्याने कायम स्वरुपी पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी नियुक्ती न केल्यामुळे वेळेवर योग्य ते उपचार होत नसल्याने गोर गरीबांचे गुर ढोर दगावत असून या ठिकाणी १ ड्रेसर, आणि २ परिचारक कार्यरत असून पशूचिकित्सक उपलब्ध नसल्याने सरकारी पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्याने खाजगी पशू चिकित्सक यांचेकडे जावे लागत असून गोर गरीब पशुपालक आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो.

या आधीच कोरोना काळात अनेकांचा रोजगार बुडाल्याने “ना हाताला काम ना खिशात दाम” अशी विदारक परिस्थिती असताना पशुपालकांचा वेळ पैसा,व मेहनत वाया जात आहे.तसेच खिर्डी येथील पशुवैदयकीय दवाखान्याचा चार्ज सावदा येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे सोपवला असल्याचे वृत असून तसेच सावदा येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी हे फक्त आठवड्यातून दोन दिवस या ठिकाणी भेट देतात.त्यामुळे ते या ठिकाणी नियमित पूर्णवेळ सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे.तसेच खिर्डी खु, खिर्डी बु, पुरी गोलवाडा, भामलवाडी,शिंगाडी, वाघाडी, रेंभोटा, या गावातील हजारो शेतकरी व पशुपालकांचा व्याप पाहता संबंधित प्रशासनाने खिर्डी येथे त्वरित कायम स्वरुपी पशू वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांसह पशुपालकांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!