खिर्डी परिसरात चक्री वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा खा.रक्षा खडसे चा पाहणी दौरा…
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर-(प्रतिनिधी)। ऐनपूर,खिर्डी, सुलवाडी, कोळदा,धामोडी या गावांमध्ये काल झालेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात केळी बागांचे नुकसान झालेले असून अनेक घरांचे पत्रे उडालेले आहेत तसेच त्यांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. त्यात अनेक झाडे कोलमडून पडलेली आहेत कालच्या चक्रीवादळामुळे या परिसरात जवळपास वीस ते पंचवीस विजेचे खांब कोसळले त्यामुळे परिसरात कालपासून वीज पुरवठा खंडित झालेला आहे. पुढील चोवीस तास वीज पुरवठा सुरळीत होईल याची शाश्वती नाही.एवढे मोठे नुकसान या भागात झालेले आहे. कालपासून वीज नसल्यामुळे लोकांचे मोबाईल ही बंद आहे त्यामुळे संपर्क होणे कठीण आहे शेतकऱ्यांच्या केळी बागाचे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान या भागातील शेतकऱ्यांचे झालेले आहे.कालपर्यंत केळीला चांगला भाव होता परंतु आज या चक्रीवादळामुळे या शेतकऱ्यांना खूप मोठे नुकसान सोसावे लागत असून त्यांना आपली केळी अतिशय कमी भावात विकावी लागणार आहे. या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी खासदार रक्षा खडसे यांनी सकाळी 9 वा.पासून पाहणी दौरा ला सुरवात केली. सर्वप्रथम ऐनपूर येथे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची त्यांनी पाहणी केली रस्त्यावर विजेचे खांब त्या ठिकाणी पडलेले होते विजेच्या तारा रस्त्यावर लोंबकळत पडलेल्या त्यांनी पहिल्या तात्काळ त्यांनी विद्युत अभियंता यांच्याशी संपर्क करून सर्व परिसरातील विद्युत पुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या कालपासून या परिसरातील सर्व गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याने रात्रभर ही गावे अंधारात होती त्यात प्रामुख्याने ऐनपूर धामोडी सुलवाडी कोळदा कांडवेल खिर्डी इत्यादी गावांचा वीज पुरवठा अजूनही 24 तास सुरळीत होऊ शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात या भागात नुकसान झालेले आहे.
धामोडी येथे नुकसानग्रस्त भागाचे पाहणी करताना त्याठिकाणी पिंपळाचे झाड वादळ वाऱ्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दोन मोटारसायकलींचा चक्काचूर होऊन नुकसान झालेले आहे तसेच एक म्हैस त्या ठिकाणी दगावली आहे शेजारील असलेल्या गोडाऊन चे पत्रे त्याठिकाणी उडालेले आहेत व एक लहान वगार ही दाबली गेली आहे. तसेच तसेच पुढील दौरा कोळदा येथे भेट दिली असता गावातील राहुल रतिराम भालेराव यांचे घर पडलेले होते घरावरची पत्रे उडाल्याने त्यांचे नुकसान झालेले आहे तसेच तेथील कायम रहिवाशी असून नुकसान ग्रस्त त्यांना राहण्यास जागा उपलब्ध नसल्यामुळे माननीय खासदार रक्षाताई खडसे यांनी ग्रामसेवक यांना त्यांना राहण्याची जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केली तसेच कोळदा येथे अनेक लोकांच्या घराचे पत्रे पुर्णतः हा त्याठिकाणी उडालेली होती व त्यांचा संसार हा उघड्यावर होता रात्रभर बाहेर पावसात थांबलेले होते घरात गुडघाभर इतके पाणी साचलेले असून काही लोकांच्या घरातील सर्व दाळ दाणा धान्य पीठ हे पाण्याने भिजलेले होते त्यांच्या जेवणाची आबाळ होती रात्रभर लाईट नव्हती अंधारात कसे तरी जागून आपल्या मुलाबाळांचे सोबत अतिशय भीतीयुक्त वातावरणात त्यांनी रात्र जागून काढली खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिल्यावर शासकीय मदत मिळवून देण्याचे त्यांना आश्वासन दिले. येत्या 10 ते 12 दिवसात या सर्व नुकसान झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.शासनाकडे त्यासाठी त्याचा पाठपुरावा करणार असून नुकसानग्रस्त लोकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी त्यांनी तहसीलदार, तलाठी ,कृषी अधिकारी ग्रामसेवक यांना त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्त झालेल्या लोकांचे यादी तयार करून शासना मार्फत त्यांना त्वरित मदत मिळण्याचे आश्वासन दिले.
कोळदा येथे भेटी दरम्यान अनेक स्त्रियांनी रडून आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडले तेव्हा रक्षा खडसे सुद्धा भावूक झाल्या सुलवाडी येथे संतोष दामू भालेराव यांच्या घरावर झाड पडलेले होते घरात पूर्णपणे नुकसान झालेले असल्याने या सर्वांना येत्या दहा ते बारा दिवसात मदत देण्याचे आश्वासन खा.रक्षा खडसे यांनी केले. तसेच सुलवाडी येथे काही लोक नुकसान ग्रस्त असताना तात्काळ त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी ग्रामसेवक यांना दिले व त्यांना घरकुल योजनेसाठी मिळवून देण्याचे सुद्धा आश्वासन त्यांनी दिले त्यांच्यासोबत रावेर तहसीलदार उषाराणि देवगुने नायब तहसीलदार ,मंडळ अधिकारी,ग्रामसेवक ,तलाठी यासह सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद पाटील-मोरगाव, जि. प. सदस्य नंदू महाजन,मा.कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन,भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, रत्नाकर महाजन,व भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष शुभम पाटील भूषण पाटील,रवी महाले व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.