खिर्डी येथे श्रीदत्त प्रभू पालखी सोहळा संपन्न
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक गावाचे आराध्य दैवत असलेले श्रीदत्त प्रभू पालखी सोहळा हा दरवर्षी प्रमाणे चैत्र शुक्ल पंचमीला भक्तिमय व आनंदमय वातावरणात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.
श्रीदत्त प्रभू मंदिरात आज सकाळपासूनच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती.तसेच आज संध्याकाळी ७ वाजता वाजत गाजत श्रीदत्त प्रभू यांच्या भव्य दिव्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली.या प्रसंगी मनोहर महानुभाव,रामेश्वर महानुभाव,रजधर पंजाबी,प्रदीप महाराज पंजाबी,मनोहर राजाराम पाटील, विनोद मनोहर पाटील, दतात्रेय पाटील,सुरेश पाटील,राजू पाटील,चंद्रकांत राणे,सतीश भंगाळे,सुनील पाटील,कुंदन नेमाडे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते