रावेर येथे 8 मे रोजी बौध्द समाजाचा 10 व्या सामुहिक विवाहसोहळयाचे आयोजन
खिर्डी ता.रावेर ,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिंधी। फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व समस्त बौध्द समाज रावेर तालुका यांचे विद्यमाने दि.8 मे रोजी बौध्द समाजाचा 10 वा सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन येथील सरदार जी.जी. हायस्कुल व ज्युनियर कॉलेज रावेर येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर विवाह सोहळयासाठी बौध्द उपासक व उपाससिका यांनी जास्ती जास्त संख्येने नोंदणी करुन सहकार्य करावे. सामुहिक विवाह करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे वेळ,पैसा, श्रम वाचतात व समाजाचा एकोपा निर्माण होऊन सामाजिक विकासाला हातभार लागतो. विवाह नोंदणी करीता संपर्क सामुहिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष राजेंद्र अटकाळे रावेर मो.नं.९७६४४९३५४५, ७७२१९३४३५८,ऑफिस फोन नं. 02584 295062 यांच्याशी संपर्क साधावा .जास्तीत जास्ती संख्येने नोंदणी केलेल्या उपवर वधु वरांसाठी,विशेष समाजकल्याण विभागा मार्फत कन्यादान योजनेतुन २०,०००, (वीस हजार) रुपये अनुदान मिळणार आहे.याची नोद घ्यावी त्यासाठी वधु वराचे शाळासोडल्याचे दाखले,जातीचे दाखले ,अधिवास दाखले,आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो व विवाह झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत विवाह नोंदणी दाखला आणणे बंधनकारक राहील. तरी बौध्द समाजातील पालकांनी आपल्या पाल्यांची नावे जास्तीत जास्त संख्येने नोंदणी फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तहसिल कार्यलया समोर रावेर येथे करावे असे आवाहन सामुहिक विवाह सोहळा समिती तर्फे करण्यात येत आहे.